संपूर्ण कर्नाटकात कोरोना महामारीमुळे सारेच भयभीत झाले आहेत. असे असतानाही सरकारने क्लोज डाऊन सुरू केला आहे. मात्र हा कर्फ्यू नागरिक म्हणावा तसा पाळत नसल्याने आणि वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने दिनांक 10 मे रोजी लॉक डाऊन करण्यासाठी महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे.
त्यावेळी लॉकडाऊनचा निर्णय स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्री येडीयुरप्पा आणि आरोग्य मंत्री सुरेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांची बैठक होणार आहे.
या तज्ञांच्या बैठकीत लॉक डाऊन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन आणि त्याचा फैलाव कमी न झाल्याने लॉक डाऊन होणार यात शंका नाही. सध्या संपूर्ण राज्यात 30 ते 40 हजारांच्या घरात रुग्णसंख्या सापडत आहे. त्यामुळे सध्या कर्नाटकात बेंगळूर पहिल्या क्रमांकावर तर बेळगाव दुसऱ्या क्रमांकावर रुग्ण सापडन्यामध्ये आहे.
त्यासाठी आता लॉकडाऊन हा एकच पर्याय राहिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बारा मे नंतर लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यासाठी आतापासूनच राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
सध्या लावण्यात आलेला कर्फ्यू नागरिक योग्यरीत्या पाळत नसल्याने संपूर्ण लॉकडाऊन करण्याखेरीज पर्याय नाही असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सरकार दिनांक 10 मे रोजी याबाबत ठोस निर्णय घेणार असल्याचे माहिती उपलब्ध झाली आहे.