वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कर्नाटकात पुन्हा एकदा 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.सोमवारी 10 मे सकाळी 6 वाजल्या पासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार असून 24 मे सायंकाळी 6 वाजे पर्यंत हा लॉकडाऊन असेल असा निर्णय घेण्यात आला आहे.कर्नाटकात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे लॉकडाऊन मधील निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत.
वाहतुकीवर निर्बंध-किराणा मालव भाजीपाला वाहतुकीसाठी दुचाकी व चार चाकी वाहतुकीवर बंदी असणार आहे. दुचाकी व चार चाकी फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असेल मात्र बांधकाम आणि कारखाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
14 दिवसांच्या लॉक डाऊन मध्ये राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून अत्यावश्यक सुविधा आणि या सुविधा देणाऱ्या लोकांची वाहतूक चालू असेल. हा लॉक डाऊन कडक असणार असून मांस विक्री,भाजीपाला मेडिकल दूध विक्रीची दुकाने चालू असतील.केवळ सकाळी 6 ते 10 या वेळेतच मांस,दूध भाजीपाला दुकाने सुरू असतील.
मेट्रो रेल्वे बंद तर रेल्वे आणि विमान सेवा सुरू असेल ऑटो रिक्षा आणि टॅक्सी फक्त अत्यावश्यक सेवा करिता चालू असेल.फक्त इमर्जन्सी सोडून आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवास बंद असेल. बँका सुरू राहतील तर आधीच ठरलेल्या लग्नाना केवळ 50 जणांसाठी परवानगी असेल.