Saturday, January 4, 2025

/

जिल्हा पंचायत मतदारसंघ पुनर्र्चना जाहीर

 belgaum

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर लोकसभा पोटनिवडणूक आणि त्यानंतर लागोपाठ जिल्हा पंचायत, तालुका पंचायत आणि महानगरपालिका निवडणुका पार पडणार आहेत. यापार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा पंचायत मतदारसंघ पुनर्रचना करण्यात आली असून यासंदर्भात निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. बेळगावमध्ये पुढील निदान ३ महिने हा निवडणुकीचाच काळ असणार आहे. त्यामुळे प्रचार, आचारसंहिता आणि निवडणुकीचा धुरळा बेळगावकरांना अनुभवता येणार आहे.

नव्या मतदारसंघ पुनर्रचनेनुसार जिल्हा पंचायतीसाठी १०१ सदस्य तर तालुका पंचायतीसाठी ३४ सदस्य अशी पुनर्र्चना करण्यात आली आहे. नव्या मतदार संघांनुसार जिल्ह्यात 21 सदस्य वाढले असून सदस्य संख्या 101 वर पोहोचली आहे. मतदार संघाची पुनर्रचना जिल्ह्यात वाढलेल्या लोकसंख्येच्या आधारावर करण्यात आली आहे. याआधी बेळगाव तालुक्यात 10 मतदारसंघ होते. त्यामध्ये आता वाढ होऊन हि संख्या १२ वर पोहोचली आहे. पुनर्रचना करण्यात आलेल्या मतदार संघांमध्ये काकती, हुदली, कडोली, हिंडलगा, सुळेभावी, सांबरा, बस्तवाड (हलगा), बागेवाडी, येळ्ळूर, संतीबस्तवाड, बेनकनहळ्ळी (बेळगुंदी) आणि उचगाव या मतदारसंघांचा समावेश आहे.

काकती मतदारसंघात काकती, होनगा आणि नवी वंटमुरी या गावांचा समावेश आहे. हुदली मतदारसंघात हुदली, धरनट्टी, मुचंडी, कलखांब, अष्टे, तुमरगुद्दी या गावांचा समावेश आहे. कडोली मतदारसंघात कडोली, केदनूर, बंबरगे, अगसगे, हंदिगनूर या गावांचा समावेश आहे. हिंडलगा मतदारसंघात हिंडलगा, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक या गावांचा समावेश आहे. सुळेभावी मतदारसंघात सुळेभावी, मारिहाळ, करडीगुद्दी, मोदगा, बाळेकुंद्री (खुर्द), बाळेकुंद्री (बुद्रुक) या गावांचा समावेश आहे. सांबरा मतदारसंघात सांबरा, मुतगा, निलजी, तारिहाळ या गावांचा समावेश आहे. बस्तवाड (हलगा) मतदारसंघात बस्तवाड, हलगा, के के कोप्प, मास्तमर्डी या गावांचा समावेश आहे. बागेवाडी मतदारसंघात बागेवाडी, भेंडिगेरी, मुत्नाळ, कुकडोळी, अरळीकट्टी, अंकलगी, बडस (खुर्द) या गावांचा समावेश आहे. येळ्ळूर मतदारसंघात येळ्ळूर, धामणे (एस.), सुळगे (ये.), देसूर, नंदिहळ्ळी या गावांचा समावेश आहे. संतीबस्तवाड मतदारसंघात संतीबस्तवाड, वाघवडे, किणये, मंडोळी या गावांचा समावेश आहे. बेनकनहळ्ळी (बेळगुंदी) मतदारसंघात बेनकनहळ्ळी, बेळगुंदी, बिजगर्णी, बेळवट्टी आणि उचगाव मतदारसंघात उचगाव, बेकिनकेरे, सुळगा, तुरमुरी, आंबेवाडी आणि कुद्रेमानी या गावांचा समावेश आहे.

जिल्हा पंचायतीप्रमाणे तालुका पंचायत मतदारसंघांची पुंनरर्चना जाहीर करण्यात आली असून तालुका पंचायतीसाठी बेळगाव तालुक्यातून ३४ मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामध्ये अगसगे , होनगा, काकती, कडोली, कंग्राळी (बुद्रुक), मुचंडी, अष्टे, सुळेभावी, मारिहाळ, बाळेकुंद्री, सांबरा, मुतगा, शिंदोळी, हलगा, बस्तवाड, बागेवाडी, भेंडिगेरी, अंकलगी, धामणे (एस.), येळ्ळूर, देसूर, संतीबस्तवाड, बिजगर्णी, बेळगुंदी, मंडोळी, बेनकनहळ्ळी, हिंडलगा, सुळगे, उचगाव, आंबेवाडी, कंग्राळी खुर्द या गावांचा समावेश आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राष्ट्रीय पक्षांमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीसह जिल्हा आणि तालुका पंचायत तसेच महानगरपालिका निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. एका बाजूला राष्ट्रीय पक्ष तर दुसऱ्या बाजूला समस्त सीमाभागातील मराठी जनता असे चित्र दिसून येत आहे. लोकसभा पोटनिवडणुकीनंतर लगेचच जिल्हा आणि तालुका पंचायतीच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून याकाळात राजकीय वातावरणातील डावपेच रंगणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.