बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यांना शिवसेना – युवा सेनेचा पाठिंबा असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
ताशिलदार गल्ली येथील गेंजी टॉवर मध्ये शुक्रवारी (दि. २) आयोजित करण्यात आलेल्या युवा सेनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सीमाभागातील युवा नेतृत्व, तडफदार आणि मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या उमेदवाराला युवा सेने पाठिंबा देत असल्याचे जाहीर करण्यात आले.
तसेच शिवसेनेचे के. पी. पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, अशी विनंती करण्यात आली.
या बैठकीला गौरांग गेंजी, विनायक हुलजी, चेतन शिरोडकर, मल्हार पावशे, महेश मजूकर, मनीष खंडागळे, तेजस लंगडे, अवधूत कंग्राळकर, प्रतीक देसूरकर, नील तवनशेट्टी, विजय मोहिते, शिवराम हुलजी, अद्वैत चव्हाण – पाटील, सोमनाथ सावंत यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.