कोरोनाचा धोका अद्याप टाळला नाही. पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. दिवसभर मोबाईलवर कोरोना संदर्भातील जनजागृती करण्यासाठी कॉलर ट्यून ऐकण्यात येत आहे. परंतु अनेक नागरिक अजूनही जागरूक झाले नाहीत.
अजूनही अनेक नागरिकांमध्ये कोरोनाबाबत गांभीर्य दिसून येत नाही. कोरोनाचा दुसरा पर्व सुरु झाला असून प्रशासनाने नवी मार्गसूची जाहीर केली आहे. या मार्गसूचीत मास्क वापरणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे.
परंतु अनेकठिकाणी नागरिक विनमस्क फिरताना दिसून येत आहेत. यासाठी गुरुवारी (दि. १ एप्रिल) पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांनी अशा बेजबाबदार नागरिकांवर कारवाई केली.
शहरातील अनेक मार्गांवर विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना अडवून पोलिसांनी आणि पालिका अधिकाऱ्यांनी सकाळी सकाळीच दंडात्मक कारवाई केली. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून २५० रुपयांचा दंड वसूल करण्याचा आदेश राज्य शासनाने मार्गसूचीत नमूद केला आहे.
यानुसार आज पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांनी कारवाई करत अनेक नागरिकांकडून दंडाची वसुली केली. पादचारी तसेच वाहनधारकांनादेखील या कारवाईचा शॉक बसला असून दंडात्मक कारवाई टाळायची असेल, आणि आपल्याला कोरोनापासून वाचायचे असेल, तर मास्कचा वापर अनिवार्य आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.