Wednesday, January 15, 2025

/

विकेंड कर्फ्यू”ला आज रात्री होणार प्रारंभ : पोलिस यंत्रणा सज्ज

 belgaum

कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने नाईट कर्फ्यू असणाऱ्या कालावधीतील नियम कठोर केलेले असताना विकेंड कर्फ्यूची अंमलबजावणी देखील काटेकोर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आज शुक्रवारी रात्री 9 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत विकेंड कर्फ्यू जारी राहणार आहे. वीकेंड कर्फ्यु दरम्यान फक्त अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत.

राज्य सरकारने गेल्या मंगळवारी 20 एप्रिल रोजी नाईट कर्फ्यू आणि विकेंड कर्फ्यू संबंधी मार्गदर्शक सूची जारी केली होती. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेबरोबरच इतर दुकानेही सुरू ठेवण्यास अनुमती देण्यात आली होती. मात्र आता सुधारित नव्या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा सुरू ठेवून उर्वरित सर्व दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत. या कालावधीत फक्त किराणा दुकाने, भाजीपाला, फळे, मेडिकल, प्रवासी सेवा, खाजगी कंपन्या, पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत.

गुरुवारपासून हा आदेश जारी करण्यात आला आहे. येत्या 4 मेपर्यंत जारी असणाऱ्या या आदेशानुसार अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, चित्रपटगृहे बंद ठेवावी लागणार आहेत. हॉटेल, बार, रेस्टॉरंट सुरू ठेवण्यास मुभा असली तरी केवळ पार्सल नेण्यास परवानगी आहे. विकेंड कर्फ्यूच्या नियमात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

वीकेंड कर्फ्यु दरम्यान फक्त अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत. त्यामुळे शनिवार आणि रविवारी सकाळी 6 ते 10 या चार तासाच्या कालावधीतच नागरिकांना आवश्यक अन्नपदार्थ, किराणामाल, भाजीपाला, फळे, दुध व अत्यावश्यक वस्तू खरेदी करून ठेवाव्या लागणार आहेत.

मात्र यावेळी देखील फेसमास्कचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन अनिवार्य असणार आहे. दरम्यान, विकेंड कर्फ्यूच्या कडक अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी नियमांचे उल्लंघन करणार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची सूचना दिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.