फडणवीस गडकरी पोटनिवडणुकीत प्रचार करण्याची शक्यता?-आगामी बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे बेळगाव मधील भाजपच्या अधिकृत उमेदवार मंगला अंगडी यांच्या प्रचारासाठी आणण्यासाठी प्रयत्न होत असल्याची माहिती येत आहे.
भाजपच्या राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंग, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, कर्नाटकातील भाजपचे राष्ट्रीय नेते सी. टी. रवी हे मंगला अंगडी यांच्या प्रचारासाठी बेळगावमध्ये येणार आहेत.
भाजपच्या केंद्रातील हे नेते मंगला अंगडी यांच्यासाठी प्रचार करणार आहेत बेळगाव सह सीमाभागात असलेल्या मराठी भाषिक मतांची संख्या पहाता महाराष्ट्र मधील भाजप नेते पोट निवडणुकीत आणून अंगडी यांच्या साठी प्रचार सभा घेण्याची शक्यता आहे.