राज्यातील कोविड रुग्णाच्या वाढत्या आकड्यामुळे राज्य सरकारने नागरिकांच्या हितदृष्टीने २७ एप्रिल रात्री ९ ते १२ मे सकाळी ६ असा १४ दिवसांचा लॉकडाऊन जरी केला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी सरकारी मार्गसूचीप्रमाणे कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी दिला आहे.
जिल्ह्यात कोविड -१९ संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारी मार्गसूचीचे नागरिकांसहित विविध विभागाच्या प्रमुखांनी, खासगी संघ, संस्थांनी, शिस्तबद्धरीत्या तसेच काटेकोरपणे पालन करावे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सदर आदेशाचे आणि सरकारी मार्गसूचीचे उल्लंघन करण्यात आल्यास आपत्ती निवारण कायदा अधिनियम २००५, सेक्शन ५१ (६०) तसेच भादंवि कलाम १८८ अन्वये कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.