Tuesday, January 7, 2025

/

शहापूर साडी उद्योग : कामगार, विणकरांवर पुन्हा आर्थिक संकट

 belgaum

बेळगाच्या शहापूर साडी उद्योगावर ज्यांचा जीवन चरितार्थ चालतो त्या जिल्ह्यातील् लाखो लोकांवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आता दुसऱ्यांदा आर्थिक संकट कोसळले असून दुर्दैवाने पुन्हा त्यांचे त्रासाचे दिवस सुरू झाले आहेत.

विस्कळीत झालेली कच्च्या मालाच्या पुरवठ्याची साखळी तसेच विविध शहरांमध्ये विषेशतः मुंबई आणि दिल्लीसारख्या कोरोनामुळे निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थितीमुळे कमी झालेली ग्राहक संख्या याचा मोठा फटका शहापूर साडी उद्योगाला बसला आहे.

गेल्या वर्षातील लॉक डाऊनमुळे झालेल्या नुकसानीतून स्वतःला सावरत असणाऱ्या या उद्योगाला आता आणखी मोठा दणका बसला असून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून उत्पादन तब्बल 80 टक्‍क्‍यांनी घटले आहे. पर्यायाने शहापूर साडी उद्योगावर ज्यांचा चरितार्थ चालतो असे सुमारे 2 लाख कामगार, विणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे, अशी माहिती पॉवरलूम चालक परशुराम ढगे यांनी दिली.Maag weaving

आपल्या देशातील सूत परदेशात निर्यात करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा गंभीर परिणाम देशातील वस्त्र उद्योगावर झाला आहे असे सांगून आम्हाला बेळगावमध्ये पावरलूमवर शहापुरी साड्या तयार करण्यासाठी दिवसाकाठी किमान 4 लाख किलो सुताची गरज असते. मात्र मुंबई येथील बाजारपेठेतील सुताचे दर प्रचंड वाढल्यामुळे बेळगावातील विनाकारांसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

खरे तर सरकारने सुताची निर्यात कमी करून ते सूत स्थानिक विणकरांना माफक दरात उपलब्ध करून दिले पाहिजे, असे ढगे यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या तीव्रतेमुळे सरकारने निर्बंध अधिक कडक करताना जीवनावश्यक सेवा वगळता अन्य सर्व व्यवहारांवर बंदी घातली आहे. त्यामुळे संबंधित इतर दुकानांत बरोबरच जगप्रसिद्ध शहापुरी साडीची विक्री करणारी दुकाने देखील गेल्या गुरुवारपासून बंद झाली आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.