Tuesday, December 24, 2024

/

होम काॅरंटाईन रुग्णांना दिलासा : सुरु घरपोच भोजन योजना

 belgaum

बेळगाव शहरातील मारवाडी युवा मंचतर्फे घरामध्येच कोरोनावर उपचार घेणाऱ्या (होम काॅरंटाईन) आणि प्रामुख्याने एकटे असणाऱ्या किंवा वृद्धांसाठी अत्यंत अल्प दरात घरपोच सकस भोजन योजना सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा फक्त शहर मर्यादित आहे.

सदर योजनेअंतर्गत होम काॅरंटाईन झालेल्या विशेष करून एकट्या-दुकट्या रुग्णांसह वयोवृद्ध रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना अवघ्या 50 रुपये इतक्या माफक दरात दुपार आणि सायंकाळ अशी दोन वेळची जेवणाची थाळी घरपोच उपलब्ध केली जाणार आहे.

कोरोना तज्ञ डॉ. माधव प्रभू यांच्या मार्गदर्शनानुसार कोरोनाग्रस्तांना पोषक असा आहार या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे.Yuva manch meals

सदर योजने अंतर्गत सात दिवसांचे काॅरंटाईन जेवण पॅकेजही उपलब्ध आहे. तेंव्हा इच्छुकांनी अधिक माहिती तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी

सायंकाळी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत 9833069306 किंवा 7090710710 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मारवाडी युवा मंच बेळगावतर्फे करण्यात आले आहे. सदर घरपोच भोजन योजनेचा गुगल पे क्रमांक 8861169037 हा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.