एसएसव्हीजी गवेल क्लब बेळगावच्या समुपदेशक संध्या शेखर यांनी एक व्यासपीठ तयार केले असून ज्याद्वारे समाजातील 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये प्रभावी संभाषण, सार्वजनिक वक्तृत्व धीटता आणि नेतृत्व कौशल्य विकसित व्हावेत यासाठी रचनात्मक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शहरांमध्ये पत्रकारांशी बोलताना संध्या शेखर यांनी ही माहिती दिली. प्रभावी संभाषण ही काळाची गरज असल्याचे सांगून अनेक शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पदवीधर मुलांना इंग्रजीत संभाषण करण्याची भीती वाटते. ही भीती दूर करण्यासाठी गवेल क्लब नांवाने व्यासपीठ सुरु करण्यात आले आहे.
टोस्टमास्टर इंटरनॅशनलने 18 वर्षाखालील मुलांकरिता हे व्यासपीठ तयार करून विकसित केले आहे. या क्लबचे सदस्य बनणाऱ्या मुलांना ‘गवेलियर्स’ असे संबोधले जाईल. ज्यांना रचनात्मक पद्धतीने प्रशिक्षित केले जाईल भाषण कसे करावे त्याची तयारी कशी करावी याचे प्रशिक्षण देण्याबरोबरच तज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली मुलांना स्वतःहून करा हे बैठकांच्या आयोजनाचे आणि मूल्यांकन तंत्र शिकवण्याचे व्यासपीठ उपलब्ध असेल या प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाची मुलांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात चांगली मदत होईल तसेच संभाषण कौशल्य निर्दोष राहील असेही संध्या शेखर यांनी सांगितले.
तेंव्हा पात्र विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन तिचा परिणामकारक वापर करावा. गवेल क्लबची बैठक दर शनिवारी सायंकाळी 5 ते 6:30 या कालावधीत होत असते. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी संध्या शेखर (मो. क्र. 9560337848) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.