चंद्र दर्शन नाही; मौलवींनी 14 रोजी केला पहिला “रोजा” निश्चित-बेंगलोर येथे सोमवारी चंद्र दर्शन न घडल्यामुळे रूयात -ए -हिलाल कमिटीने उद्या बुधवार दि. 14 एप्रिल रोजी पहिला “रोजा” घोषित केला आहे. कमिटीचे मौलाना मकसूद इमरान राशदी यांनी ही घोषणा केली आहे.
रूयात -ए -हिलाल आणि अमीर -ए -शरियतचे निमंत्रक हजरत मौलाना सागिर अहमद खान राशदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पहिला रोजा बुधवारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील बेंगलोर शहरासह बेळगाव, हुबळी, बेळ्ळारी, म्हैसूर, गदग आणि तुमकुर या जिल्ह्यांमध्ये चंद्र दर्शन घडलेले नाही. त्याचप्रमाणे दिल्ली, भोपाळ, मुंबई, गुजरात, अलाहाबाद, चेन्नई, पालनपुर, हैदराबाद, विजयवाडा आणि अन्य ठिकाणी देखील चंद्र दर्शन न घडल्यामुळे बेंगलोर येथे झालेल्या बैठकीत सर्व उलेमांनी बुधवार दि. 14 एप्रिल हा “रमजान”चा पहिला दिवस म्हणून निश्चित करण्याचा निर्णय एकमताने घेतला.