माजी मंत्री आणि गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांना कोरोनाची लागण झाली ते कोविड पोजिटिव्ह आहेत अशी माहिती नगरविकास मंत्री भैरत्ती बसवराज यांनी बेळगावात दिली.
बेळगाव पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी बसवराज हे बेळगावात आले आहेत त्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
रमेश जारकीहोळी बंगळूरू मध्ये होते गोकाक मधील इस्पितळात उपचार घेत आहेत या पोटनिवडणुकीत प्रचारात सहभागी होणार नाहीत आगामी दोन दिवसात भालचंद्र जारकीहोळी प्रचारात सहभागी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मी केवळ निवडणुकीच्या प्रचारा बाबत बसवराज यांच्याशी चर्चा केली आहे बाकी कोणत्याही विषयावर बोलणं झालं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
सध्या रमेश जारकीहोळी यांचे अश्लील सी डी प्रकरण गाजत असून ते बेळगाव पोट निवडणुकीत सहभागी होतील की नाही याबाबत अगोदरच अनेक मते व्यक्त होत होती त्यातच त्यांचे लहान बंधू सतीश जारकीहोळी हे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यामुळे रमेश जारकीहोळी हे निवडणूक प्रचारात सहभागी होणार नसल्याने याबाबत राजकीय गोटात अनेक तर्क वितर्कांना उत आला आहे.
आता कस बाहेर येईल तोंड काळ करून