कर्नाटकचे माजी जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी याना कोरोनाची बाधा झाली होती.
गोकाक तालुका रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन होम क्वारंटाईन असलेल्या रमेश जारकीहोळी यांच्या मुलाला देखील कोरोना झाल्याचे समजते आहे. आमदार रमेश जारकीहोळी हे कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर त्यांचे द्वितीय पुत्र अमरनाथ जारकीहोळी यांना देखील कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
केएमएफचे संचालक अमरनाथ जारकीहोळी यांना गोकाकच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अमरनाथ जारकीहोळी यांची तब्येत बिघडल्याने आणि कोविडसदृश्य लक्षणे दिसून आल्याने त्यांची कोविड चाचणी करण्यात आली. या चाचणीत अमरनाथ जारकीहोळी यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
अमरनाथ जारकीहोळी यांच्यावर कोविड वॉर्डमध्ये उपचार करण्यात येत आहेत.