Saturday, December 21, 2024

/

धोका वाढला; नव्याने आढळले 101 रुग्ण : जेएनएमसी हॉस्टेल्स मायक्रो कंटेन्मेट झोन

 belgaum

बेळगाव जिल्ह्यात या एप्रिल महिन्यामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याचे आढळून आले असून आज बुधवारी जिल्ह्यात नव्याने 101 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांपैकी तब्बल 76 रुग्ण बेळगाव शहर व तालुक्यातील आहेत. शहरातील जेएनएमसी हाॅस्टेल्समध्ये कोरोना बाधितांची 22 प्रकरणे आढळून आल्यामुळे संगम हाॅस्टेल आणि पीएनपी हाॅस्टेल ही दोन हॉस्टेल्स मायक्रो कंटेन्मेट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 101 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे आज बुधवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 27,742 इतकी झाली आहे. बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार आज बुधवार दि. 7 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगांव जिल्ह्यात एकूण 6,03,040 व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. जिल्ह्यात 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 36,459 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 398 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 31,042 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 5,35,141 आहे.

कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 6,01,948 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 27,742 नमुन्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून यामध्ये आज बुधवारी नव्याने आढळलेल्या 101 जणांच्या अहवालांचा समावेश आहे. प्रयोगशाळेत धाडलेल्या नमुन्यांपैकी 5,68,593 नमुने निगेटिव्ह असून जिल्ह्यात सक्रिय रुग्ण (ॲक्टिव्ह केसीस) 398 आहेत. त्याचप्रमाणे 2,349 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 344 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 27,000 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आज बुधवारी आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये बेळगाव तालुक्यातील 76, गोकाक 9, हुक्केरी व खानापुर प्रत्येकी 3, चिक्कोडी, रामदुर्ग व रायबाग प्रत्येकी 2, तर अथणी, बैलहोंगल, सौंदत्ती व इतर प्रत्येकी 1 अशा एकुण 101 रुग्णांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.