अंत्यविधीसाठी केवळ ५ ज्यांना परवानगी;राज्य सरकारचा अधिकृत आदेश-दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असलेल्या कोविड रुग्णांच्या संख्येने कोविड नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्यात आली आहे.
राज्य सरकारने वाढत्या कोविड रुग्णांची संख्या लक्षात घेऊन विविध गोष्टींसाठी नवी मार्गसूची जाहीर केली असून अंत्यविधीसाठी केवळ ५ जणांनाच परवानगी देण्यात आली आहे.
प्रारंभी अंत्यविधीसाठी २५ जणांना मुभा देण्यात आली होती. परंतु पुन्हा कोविड रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने महत्वपूर्ण आदेश बजावला आहे. या आदेशानुसार आता केवळ ५ जणांना अंत्यविधीच्या सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.
राज्यात कोविड रुग्णांची संख्या दुप्पट वेगाने वाढत असून पुन्हा मार्गसूची कडक करण्याची तयारी सरकार चालविल्याचे समजते. नव्या मार्गसूचीनुसार जाहीर करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.