Saturday, November 16, 2024

/

कर्मचाऱ्यांच्या संपात कुटुंबदेखील होणार सहभागी

 belgaum

सहावे वेतन आयोग लागू करण्याच्या अटीवर परिवहन कर्मचाऱ्यांच्या राज्यभर सुरु असलेल्या संपात आता कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयही सहभागी होणार आहेत. सरकारकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने 12 एप्रिल पासून कर्मचार्‍यांचे कुटुंबीय हातामध्ये ताट, वाट्यांचा नाद करत निदर्शने करणार आहेत, अशी माहिती कर्मचारी संघटनेचे मानद अध्यक्ष कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी दिली. आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

परिवहन बस कर्मचार्‍यांनी मागणी केलेल्या सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसींसह काही मागण्या अद्याप अपूर्ण आहेत. 16 मार्च रोजी सरकारला नोटीस दिली होती. मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला पुरेसा वेळा दिला. समोरासमोर झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर 7 एप्रिलपासून संप सुरु केला. पण, 6 एप्रिल रोजीच संप सुरु झाल्याचा आरोप सरकार करत आहे. मार्च महिन्याचे वेतन अद्यापही कर्मचार्‍यांना मिळालेले नाही. मंगळवारी गुढीपाडवा आहे. कर्मचार्‍यांनी सण कसा साजरा करायचा? मंत्रीवर्ग तूप-पोळी खाणार आणि कर्मचार्‍यांनी काय खायचे? असे प्रश्‍न कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी उपस्थित केले.

संप काळात प्रवाशांना वाहतूक सेवा दिलेल्या कर्मचार्‍यांना सोमवारी मार्च महिन्याचे वेतन देण्याचा आदेश मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवयोगी कळसद यांनी दिला आहे. संप पुकारलेला असताना, जीवाची भीती असतानाही काही कर्मचार्‍यांनी सेवा दिली. संपामुळे विद्यार्थी आणि मासिक बसपासधारकांना सेवा देणे शक्य झाले नसल्याबद्दल कळसद यांनी खेद व्यक्‍त केला आहे. संप असूनही रविवारी दुपारपर्यंत १७७२ बस रस्त्यावर उतरल्या. सलग पाचव्या दिवशीही कर्मचार्‍यांनी संप सुरूच ठेवला असून, आतापर्यंत वायव्य परिवहन विभागातील २६८, बीएमटीसी २१२, केएसआरटीसीमधील ८४८ आणि ईशान्य परिवहन विभागातील ४४४ बस सुरू झाल्याचे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.