बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार मंगला अंगडी यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे गुरुवार दि. 15 एप्रिल रोजी बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे गुरुवारी सकाळी 11 वाजता बेळगावात आगमन होणार असून त्यांचा दौरा निश्चित करण्यात आला आहे
. सध्यातरी हिंडलगा येथील गोकुळनगर येथे गुरुवारी सायंकाळी 4 वाजता गडकरी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यांच्या दौऱ्याचा इतर तपशील अद्याप निश्चित करण्यात आला नसून त्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील यांनी दिली आहे.