कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारने नाईट कर्फ्यू लावला आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन धडपडत आहे. दिवसाकाठी दीडशे ते दोनशे कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने जिल्ह्यात आता खबरदारी घेण्यात आली आहे.
बेळगाव शहरात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन परिणामी रात्री 9 ते सकाळी सहा पर्यंत नाईट कर्फ्यू राहणार असून शनिवार आणि रविवार असे दोन दिवस लाकडाऊन असणार आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्व नागरिकांनी नियम पाळावेत असे आवाहन करण्यात येत आहे. या दरम्यान राज्य सरकारने घालून दिलेल्या मार्ग सूचीनुसार काय सुरू आणि काय बंद याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहेत. सरकारने जारी केलेले नियम पुढीलप्रमाणे आहेत…
तोंडाला मास्क व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना महानगरपालिका कार्यक्षेत्रात अडीचशे रुपये तर नगरपालिका नगरपंचायत आणि ग्रामपंचायत हद्दीत शंभर रुपये दंड बसणार आहे.
यादरम्यान भाजी मार्केट बाजार पेठ येथे मार्शल पथक नेमून नियमांचे पालन करण्यासाठी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
दुकानदार व इतर उद्योगांना तीन फुटाचे अंतर ठेवून व्यवसाय करावा लागणार आहे. मास्क न घातलेल्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचे साहित्य देण्यात येणार नाही तसे केल्यास त्यांच्या कारवाई केली जाणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरला नाही तर संबंधितांना तातडीने rt-pcr चाचणी करण्यासाठी थेट हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात येणार आहे.
अंतयात्रा अंत्यविधीसाठी 50 जणांना मुभा असून जर स्मशानभूमी लहान असेल तर 25 जणांना परवानगी देण्यात आली आहे.
विवाह समारंभासाठी परवानगी नसतानाही कार्यालय दिल्यास संबंधितांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. विवाहसाठी केवळ पन्नास लोकांना परवानगी असणार आहे. विवाहासाठी लागणारा परवाना संबंधित प्राधिकरणाकडून घ्यावा लागणार आहे.
त्या ठिकाणी मार्शल फोर्स तैनात करण्यात येणार आहे. दुकानदार व इतर उद्योजकांना तीन फुटाचे अंतर ठेवूनच व्यवसाय साठी परवानगी दिली जाणार आहे यासह अनेक नियम व अटी घालून देण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे कोरोनाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्याची खैर नाही असेच सांगण्याचा सरकारचा हेतू आहे. त्यामुळे कोरोना टाळण्यासाठी आणि थोपवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन सरकारने केले आहे.
आज पासून नाईट कर्फ्यू आणि विकेन्ड कर्फ्यू लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बऱ्याच अंशी कोरोना नियंत्रणात येईल अशी आशा राज्य सरकारला आहे. मात्र नागरिकांनी यासाठी सहकार्य करणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. जर नियम आणि अटी मोडल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.