कर्नाटकात नाईट कर्फ्युची घोषणा; मात्र लॉकडाऊनची घाई नको : पंतप्रधानांचे आवाहन –
कर्नाटकातील वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यामुळे नाईट कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला आहे. 21 एप्रिल ते 4 मे पर्यंत रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत संपूर्ण राज्यात नाईट कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. तसेच शुक्रवारी रात्री 9 ते सोमवारी सकाळी 6 पर्यंत विकेंड कर्फ्युदेखील जाहीर करण्यात आला आहे.
याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कोरोनासंदर्भात आज भाषण केले आहे. या भाषणात लॉकडाऊन हा अंतिम पर्याय असावा असे सांगितले आहे. तसेच देशाला लॉकडाऊन पासून वाचवायचे आहे, असे आवाहन केले. अनेक राज्यांत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे.
अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचा विचार सुरू आहे. मात्र राज्यांनी लॉकडाऊन ची घाई करू नये, मायक्रो कंटेन्मेंट झोनवर लक्ष केंद्रित करावे, कामगारांनी स्थलांतर करू नये, तसेच कोरोना नियंत्रणासाठी तरुणांनी पुढाकार घेऊन साथ द्यावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
जनतेने कोरोना नियंत्रणासाठी स्वयंशिस्त बाळगावी. जगभरातील देशांपैकी भारतात सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून ऑक्सिजन पुरवठ्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत असून नागरिकांनी धैर्याने या परिस्थितीला सामोरे जावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.