राज्यासह बेळगाव जिल्ह्यातही कोरोनाबाधोत रुग्णांचा आकडा स्फोटक पद्धतीने वाढत आहे. कोरोनाग्रस्तांचे वाढते आकडे आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाने शहरात नव्याने मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत.
कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने शहरात सदाशिवनगर आणि खासबाग येथे २ मायक्रो कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सदाशिवनगर परिसरात सातत्याने कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. आता एकाच कुटुंबात ८ जणांना बाधा झाल्यामुळे सदाशिवनगरातील तो भाग मायक्रो कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे.
तसेच दोन दिवसांपूर्वी खासबाग येथे एकाच घरात ६ जणांना कोरोना लागण झाली. त्यामुळे तेथेही मायक्रो कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे.