Monday, December 23, 2024

/

नव्याने 46 रुग्णांची भर : एकूण पॉझिटिव्ह रुग्ण झाले 27,460

 belgaum

बेळगाव जिल्ह्यात नव्याने 46 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 27,460 झाली असून आतापर्यंत 26,865 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे

बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार आज गुरुवार दि. 1 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगांव जिल्ह्यात एकूण 5,87,063 व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. जिल्ह्यात 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 33,435 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 251 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 25,555 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 5,27,822 आहे.

कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 5,82,845 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 27,460 नमुन्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून यामध्ये आज गुरुवारी नव्याने आढळलेल्या 46 जणांच्या अहवालांचा समावेश आहे. प्रयोगशाळेत धाडलेल्या नमुन्यांपैकी 5,85,971 नमुने निगेटिव्ह असून जिल्ह्यात सक्रिय रुग्ण (ॲक्टिव्ह केसीस) 251 आहेत. त्याचप्रमाणे 3,079 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 344 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 26,862 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आज गुरुवारी आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये बेळगाव तालुक्यातील 17, अथणी 7, गोकाक व रामदुर्ग प्रत्येकी 6, चिकोडी 4, हुक्केरी व खानापुर प्रत्येकी 1 आणि इतर 4 अशा एकुण 46 रुग्णांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.