कर्नाटक राज्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत नव्याने 9,579 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 10,74,869 इतकी वाढली आहे. तसेच आज सोमवार दि. 12 एप्रिल 2021 रोजी दुपारी 3:30 वाजेपर्यंत राज्यातील एकुण 3 लाख 72 हजार 450 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार रविवार दि. 11 एप्रिल 2021 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत आणखी 2,767 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून उपचाराअंती पूर्णपणे बरे होऊन डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची एकुण संख्या 9,85,924 इतकी झाली आहे.
राज्यात नव्याने 9,579 रुग्ण सापडल्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 10,74,869 इतकी वाढली असून यापैकी 470 जणांवर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 75,985 इतकी झाली आहे. कोरोनामुळे राज्यात नव्याने 52 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची एकूण संख्या 12,941 इतकी झाली आहे. राज्यातील विमानतळांवर आतापर्यंत 3,42,467 इतक्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ब्रिटनमधून गेल्या 25 नोव्हेंबर 2020 पासून आत्तापर्यंत राज्यात आलेल्या 17,921 प्रवाशांचा समावेश आहे.
बेळगाव जिल्ह्यात नव्याने 39 रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 28,098 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या 351 इतकी वाढली आहे. बेळगाव जिल्ह्यात सध्या एकूण 584 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी आणखी 46 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकूण रुग्णांची संख्या 27,163 इतकी झाली आहे.
दरम्यान, आज सोमवार दि. 12 एप्रिल 2021 रोजी दुपारी 3:30 वाजेपर्यंत राज्यातील एकुण 3 लाख 72 हजार 450 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. राज्यातील 44 ते 59 वर्षे वयोगटातील 1,05,383 नागरिकांना लसीचा पहिला डोस तर 756 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 60 वर्षावरील 1,81,902 नागरिकांना लसीचा पहिला डोस तर 2,302 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. राज्यात बेंगळूर अर्बन अर्थात बेंगलोर शहर परिसरात 1 लाख 53 हजार 618 इतके सर्वाधिक लसीकरण झाले आहे.