मी स्वतः तसेच माझा भाऊ चरणराज आणि ड्रायव्हर अशा आम्हा तिघा जणांची कोरोना चांचणी पॉझिटिव्ह आली आहे, अशी माहिती बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे नमूद करण्याबरोबरच कृपया आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपापली कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले आहे.
गेल्या कांही दिवसांपासून आमदार हेब्बाळकर या लोकसभा पोटनिवडणूकीतील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी दिवस-रात्र मेहनत घेत होत्या.
बेळगावात प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या मागोमाग आता आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यामुळे भाजपप्रमाणे आता काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये देखील अस्वस्थता निर्माण झाली आहे.