राज्यात कोरोना व्हायरसचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे आणि परिस्थिती हाताबाहेर जात आहे. आता अपरिहार्यपणे, कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना मंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले की, राज्यपाल वजुभाई वाला आणि सीएम येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात आज सर्वपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत कोविड संदर्भात सर्वात कठीण नियमांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
राज्यात कोरोनाव्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आहे. लोकांच्या दुर्लक्षामुळे, अनेकवेळा पूर्वसूचना देऊनही लोक दुर्लक्ष करत आहेत. कोविड परिस्थिती हि युद्धासारखी आहे. आम्ही कोंडीत आहोत.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड्सची व्यवस्था करणे शक्य होत नाही. ऑक्सिजन, आयसीयू सिस्टम वाढविणे आवश्यक आहे. अशावेळी प्रतिष्ठेचा मुद्दा महत्वाचा न मानता प्रत्येकाने कोविड परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. के. सुधाकर यांनी केले.
कोविड परिस्थितीवर विरोधक आरोपांवर आरोप करत आहेत. त्यांचे आरोप नाकारता येत नाहीत. परंतु संक्रमित रुग्णांची संख्या वाढते बेड्स आणि ऑक्सिजनची कमतरता वाढत आहे. कोविड सारखा संसर्गजन्य रोग संपूर्ण जगभरात पसरला आहे. यामुळे कर्नाटक राज्याप्रमाणेच अनेक ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवली आहे.
याचा अर्थ असा होत नाही की सरकार अपयशी ठरत आहे आणि प्रशासन योग्य नाही. बेड, आयसीयू, औषधांची व्यवस्था करता येते, परंतु डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी तयार करता येत नाहीत. त्यामुळे दोषारोप करण्याची ही वेळ नसून आता प्रत्येकाने संघटित होऊन या परिस्थितीशी लढण्याची तयारी ठेवावी, असे सुधाकर म्हणाले.