बेळगाव लोकसभा पोटनिवडणुक लढविणार महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यांच्या चिन्हाने सोशल मीडिया गाजत आहे. व्हाट्सअप स्टेटस, व्हाट्सअप डीपी, फेसबुक स्टोरी अशा असंख्य पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहेत.
सीमाभागात इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याची चर्चा करण्यात येत आहे. तत्कालीन आमदार बळवंतराव सायनाक यांना विधानसभा निवडणुकीत सिंह हेच चिन्ह मिळाले होते. त्यानंतर कित्येक वर्षांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीला सिंह हे चिन्ह मिळाले आहे. सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली असून सर्वोच्च स्थानावर जनतेने शुभम शेळके यांना पसंती दिली आहे.
सीमाभागातील हजारो मराठी भाषिकांच्या व्हास्टप स्टेटसवर शुभम शेळके, समिती आणि सिंह याच चिन्हाची चालती आहे. तसेच अनेकांनी सिंहाचे चित्र आपल्या व्हाट्सअप डीपीवर ठेवून समिती आणि शुभम शेळके यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्याचप्रमाणे फेसबुकवरदेखील अनेक स्टोरीज अपलोड करण्यात येत असून, आपण समिती आणि शुभम शेळके यांच्या पाठीशी असल्याच्या पोस्ट टाकण्यात येत आहेत.
शुभम शेळके यांच्यासारखे नेतृत्व मराठी भाषिकांना मिळाले असून सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराला पूर्णविराम मिळेल, तसेच या अन्याय आणि अत्याचाराविरोधात कुणीतरी खंबीरपणे आवाज उठविणारा नेता मिळाला असल्याचीही चर्चा फेसबुक, व्हॉट्सअप वर रंगात आहेत.
‘बेळगाव लाईव्ह’ च्या माध्यमातून देखील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यांना विजयी करण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यात आला आहे. बेळगाव लाईव्ह फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात येणाऱ्या स्टोरीजन हजारो लोकांनी पसंती दर्शविली आहे. ‘समितीचा सिंह आला.., सिंह समिती शेळके, केवळ सिंह…’ अशा अनेक टॅगलाईनसह शुभम शेळके यांना जोरदार पाठिंबा मिळत आहे.