कोविड पार्श्वभूमीवर कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. २२ एप्रिल ते ३० एप्रिल या कार्यकाळात या परीक्षांचे नियोजन करण्यात आले होते.
परंतु वाढत्या कोविड परिस्थितीमुळे या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आयोगाचे सचिव जी. सत्यवती यांनी दिली आहे.
या परीक्षेसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील उमेदवार २२ ते २८ एप्रिल पर्यंत बेंगळूर परीक्षा केंद्रात आणि २९ ते ३० एप्रिल पर्यंत विभागीय परीक्षा केंद्रात हजर राहणार होते.
परंतु दिवसेंदिवस कोविड संक्रमितांची संख्या वाढत चालली सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती २० एप्रिल रोजी एका आदेशाद्वारे देण्यात आली आहे. २१ एप्रिल पासून राज्यभर सुरु होणाऱ्या नाईट कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत.
कोविड परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर काही दिवसात आयोगाच्या http://kpsc.kar.nic.in वेबसाईटवर परीक्षेसंदर्भात पुढील माहिती देण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आयोगाचे सचिव जी. सत्यवती यांनी केले आहे.