मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पार यांनी उद्या मंगळवारी रात्री नऊ वाजल्यापासून 10 मे पर्यंत संपूर्ण राज्यात चौदा दिवसांचा लॉकडाऊन जारी केला आहे. बंगळूरू सह राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाऊले उचलत मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेत मंगळवारी 26 एप्रिल रात्री 9 वाजल्या पासून राज्यभरात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी नंतर पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली राज्यात आणि विशेष करून बंगळूरू शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या ध्यानात घेत कोविड तांत्रिक सल्लागार समितीने देखील राज्यात कडक कर्फ्यु लागू करण्याचा सल्ला दिला होता त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
सकाळी 6 ते 10 पर्यंत मिळणार गरजू वस्तू
मंगळवारी रात्री 9 पासून कर्फ्यु लागू होणार असून आगामी 14 दिवस 10 मे पर्यंत कडक नियमांची अंमलबजावणी होणार आहे.विकेंड कर्फ्यु प्रमाणेच या लॉक डाऊनची नियनमावली असणार असून सकाळी 6 ते 10 या वेळेत सूट असून किराणा भाजी गरजू वस्तू मिळणार आहेत या शिवाय मेडिकल आणि अति गरजू वस्तू 24 तास उपलब्ध असतील. बांधकाम इंडस्ट्री ,दारू दुकाने वीकेंड नियमानुसार तर हॉटेल पार्सल सुविधा असणार आहे.
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी नजीकच्या काळात राज्यात कोणत्याच निवडणुका होणार नाहीत असेही म्हटले असून यासंदर्भात आपण निवडणूक आयोगाकडे शिफारस करत असल्याचेही पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. त्यामुळे बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक किमान सहा महिने लांबणीवर पडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.