कोविडग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अनेक स्मारके, संग्रहालय आणि देवस्थाने काही काळापर्यंत बंद करण्याची सूचना देण्यात आली आहे. बेळगावमधील किल्ला परिसरात असलेले कमल बस्ती हे देवस्थानदेखील येत्या १५ मे पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोविड साखळी तोडण्यासाठी आणि संसर्ग पसरण्यापासून रोखण्यासाठी केंद्रीय संरक्षक स्मारके, संग्रहालये त्वरित बंद करण्यात यावेत, असे आदेश एएसआय एन. के. पथक यांनी दिले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत हि ठिकाणे बंद ठेवण्यात यावीत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
इ. स. १२०४ मध्ये बांधण्यात आलेली कमल बस्ती हि बेळगावमधील किल्ला परिसरात वसली आहे. चालुक्य शैलीत बांधण्यात आलेल्या या किल्ल्यातील तीन मंदिरापैकी हा एक भाग आहे. तिची शिखरा कदंब नगारा शैलीमध्ये आहे, हि बस्ती अद्वितीय स्मारकात गणली जात असून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेमार्फत याची देखभाल केली जाते.