कर्नाटक राज्याचे ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याविरोधात तक्रार केली असल्याची बातमी सध्या चर्चेत आहे. या पत्रावरून राजकीय क्षेत्रात चांगलीच चर्चा, टीका सुरु असून या पात्राबाबत मंत्री ईश्वरप्पा यांनी खुलासा दिला आहे.
ग्रामविकास खात्यातील समस्यां आपण मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. यासोबतच राष्ट्रीय नेत्यांचाही निदर्शनास सदर गोष्टी आणून दिल्या होत्या. परंतु कोणाविरोधात आपण तक्रार केली नाही. माहिती आणि तक्रार यामध्ये फार असून माध्यमांनी हा फरक समजून घेतला पाहिजे, असे विधान मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी केले.
ते पुढे म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत मी पक्षविरोधात जाणार नाही. राजभवनात गेल्याचे आपण स्पष्टीकरण देत असून त्याठिकाणी मी कोणाविरोधात तक्रार देण्यासाठी नाही तर माहिती देण्यासाठी गेलो होती.
मुख्यमंत्र्यांविरोधात तर मी कोणतीही तक्रार दाखल केली नसल्याचे ईश्वरप्पानी स्पष्ट केले. येडियुरप्पा हे आमचे प्रमुख नेते आहेत. माझ्या खात्यातील समस्यांबाबत मी पक्षातील नेत्यांना पत्र लिहिले आहे, याबद्दल कोणीही गैरसमज करून घेऊ नये, अशी विनंतीही मंत्री ईश्वरप्पा यांनी केली.