कोरोनाची दुसरी लाट आणखी 40 दिवसापर्यंत सुरू राहणार असल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डाॅ. के. सुधाकर यांनी दिली.
बेंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री डॉ. सुधाकर म्हणाले की, राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आणखी 40 दिवस राहणार असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. सर्वांनी घरातच राहावे. कोरोनाच्या पहिल्या लाटे पेक्षा या दुसऱ्या लाटेमध्ये लोक मोठ्या प्रमाणात संसर्गग्रस्त झाले आहेत.
कोरोनाची कोणतीही लक्षणे नसताना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे हॉस्पिटलमध्ये भरती होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तेंव्हा कोरोनाची लक्षणे दिसत नसली तरी संबंधित रुग्णांच्या कुटुंबातील व्यक्तींनी आपापली कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही मंत्री डाॅ. के. सुधाकर यांनी केले आहे.
एकंदर आणखी 40 दिवस असणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आणखी किती हानी होणार याचे उत्तर येणारा काळच देऊ शकणार आहे.