कर्नाटक सरकारकडून राज्यातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी आज सोमवारी केली.
बेंगलोर येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली सरकार लस खरेदी करण्याच्या आणि ती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढविण्याच्या प्रयत्नात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच कर्नाटकातील सर्व सरकारी लसीकरण केंद्राच्या ठिकाणी 18 ते 44 वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिली जाईल.
त्याचप्रमाणे केंद्र सरकारची 45 वर्षे वयोगटावरील नागरिकांना लस देण्याची मोहीम देखील सुरूच राहणार आहे अशी माहिती देऊन लसीकरणासाठी पात्र नागरिकांनी 28 एप्रिलपासून आपली नांवे नोंदवावीत, असे आवाहन मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी ट्विटद्वारे केले आहे.