कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्या स्मारकात आलेल्या अनेकांना संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच मुख्यमंत्र्यांसमवेत प्रचारात सहभागी झालेल्या सवदत्तीच्या आमदारांनाही कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सौन्दत्तीचे आमदार आनंद मामनी यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
विधानसभेचे उपसभापती असलेले आनंद मामनी बेळगावमध्ये सुरु असलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी दाखल झाले होते. मुख्यमंत्र्यांसमवेत दिनांक १४ आणि १५ एप्रिल रोजी येडियुराप्पा यांच्यासमवेत त्यांनी मंगला अंगडी यांच्यासाठी प्रचार केला.
आज मुख्यमंत्र्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न होताच त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांनाही कोरोना संसर्ग होण्याची शक्यता होती. दरम्यान आनंद मामनी यांच्यातही कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची चाचणी घेण्यात आली असता, त्यांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी बेळगावमधील प्रचारादरम्यान अनेकांची भेटगाठ घेतली असून त्यांच्या संपर्कात आलेल्या नेमक्या किती जणांना कोरोना संसर्ग होईल, याची भीती बळावत चालली आहे.