बेळगाव जिल्ह्यातील कोविड परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत आहे. एका बाजूला कोविड रुग्णांची आकडेवारी वाढत आहे तर दुसरीकडे मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. संपूर्ण देशभरात कोविडने धुमाकूळ घातला आहे.
आज बेळगाव सदाशिव नगर स्मशानभूमीत एकाचवेळी ११ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे वृत्त आहे. परंतु हे सर्व ११ जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत कि नाही? याबाबत मात्र साशंकता आहे. या अकराही मृतदेहांवर कोविड नियमावलीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
आज सकाळपासून सदाशिव नगर स्मशानभूमीत ११ मृतदेह दाखल झाले. या सर्व मृतदेहांवर कोविड नियमावलीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. परंतु हे सर्व मृतदेह कोविड पॉझिटिव्ह आहेत का याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सकाळी एकाचवेळी ७ मृतदेह अचानक स्मशानभूमीत दाखल झाले.
महानगरपालिका नियुक्त कर्मचाऱ्यांना यासंदर्भात विचारण्यात आले असता यातील एकाच कोविड मुले मृत्यू झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. सदर ११ मृतदेहांपैकी एकाचा कोविड मुळे मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. तर उर्वरित १० जण खाजगी रुग्णालयात उपचार घेतले असल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच उर्वरित दहा जणांचा विविध आजारणामुळे मृत्यू झाल्याचेही उघड झाले आहे.
२० एप्रिल पासून २९ एप्रिल पर्यंत एकूण ९४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. २० एप्रिल रोजी ६, २१ एप्रिल रोजी २, २२ एप्रिल रोजी ७, २३ एप्रिल रोजी १०, २४ एप्रिल रोजी ४, २५ एप्रिल रोजी ८, २६ एप्रिल रोजी ८, २७ एप्रिल रोजी ८, २७ एप्रिल रोजी १८, २८ एप्रिल रोजी ११ आणि २९ एप्रिल रोजी दुपारपर्यंत एकूण २० अशा एकूण ९४ मृतदेहांवर सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.