Saturday, January 18, 2025

/

मतदानासाठी वाढीव वेळ! ‘या’वेळेत होणार मतदान

 belgaum

येत्या १७ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे. मतदानाची वेळ 12 तासांची करण्यात आली असून कोरोना परिस्थितीमुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

यावेळी कोरोनामुळे मतदान केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीनची संख्या देखील वाढणार आहे. यासह मतदान केंद्रांची संख्या वाढल्यामुळे मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे.

मतदानाची वेळ वाढवल्यामुळे मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे. या निवडणुकीत मतदारांच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात निवडणूक कर्मचाऱ्यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली.

या निवडणुकीत निवडणूक कर्मचाऱ्यांना त्यांची नियुक्ती असलेल्या मतदान केंद्रावर मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र त्या कर्मचाऱ्यांकडे ईलेक्शन ड्युटी सर्टीफिकेट (ईडीसी) असणे आवश्यक आहे.

याशिवाय मतदान करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना कोविड नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आणि बंधनकारक असणार आहे. सुरक्षितता, सामाजिक अंतर आणि मास्क परिधान करणे आवश्यक असून मतदाराची ओळख पटण्यासाठी मतदारांना आवश्यकतेनुसार फेसमास्क काढावा लागेल. यासह विविध मार्गदर्शक सूचनादेखील आधीच देण्यात आल्या आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.