बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यांना प्रचंड मतांनी विजयी करून आपली लोकेच्छा प्रकट करा, असे आवाहन महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वय मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वय मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका व्हिडीओ क्लिपद्वारे उपरोक्त आवाहन केले आहे. बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या येत्या 17 एप्रिल रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून शुभम शेळके हे उभे आहेत.
शुभम शेळके यांना शिवसेनेचा देखील सक्रिय पाठिंबा आहे. यासाठी समन्वय मंत्री या नात्याने माझी तमाम मतदारांना नम्र विनंती आहे की महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि लोकेच्छा प्रकट करा, असे मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आवाहनात म्हंटले आहे.