कोरोना काळात होणाऱ्या गर्दीचा विचार करुन एपीएमसी भाजी मार्केट तीन ठिकाणी विभागून स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र ही तीनही ठिकाणे बेळगाव उत्तर भागात आहेत. परिणामी दक्षिण भागातील तसेच खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ती त्रासदायक ठरत असल्याने बेळगाव दक्षिण भागातही एपीएमसी होलसेल भाजी मार्केटची शाखा सुरू करण्याची जोरदार मागणी होत आहे.
शहापूर जुने बेळगाव अंघोळ आधी भागांसह खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बेळगाव उत्तर भागात असणाऱ्या भाजी मार्केटच्या ठिकाणी भाजी घेऊन जातानां पोलीस सोडतील. पण परत येतानां भाजी घेऊन मार्केटला घेऊन गेलो होतो म्हणून सांगेपर्यंत शेतकऱ्याला चारपाच लाठ्या बसलेल्या असतात. कारण येतानां त्याच्याकडे कांही ओळखच नसते. कृषी खात्याने शेतकऱ्यांना ओळखपत्रही दिलेली नाहीत. वास्तविक भाजी मार्केटच्या ठिकाणीच ही ओळखपत्रं देणे सोयीचे आणि खात्रीशीर असणार आहे.
वडगाव, शहापूर, जूने बेळगाव, अनगोळ, धामणे, येळ्ळूर, मजगाव, मच्छे, हालगा, सुळगा, देसूर, राजहंसगड, नंदीहळ्ळीसह इतर शहरी व ग्रामीण भागातील शेतकरी भाजीपाला पिकवतात. तो होलसेल भाजीमार्केटला घेऊन जातात. पण आता गर्दी टाळण्यासाठी एपीएमसी भाजी मार्केट उत्तर भागात तीन ठिकाणी विभागण्यात आले आहे. त्याप्रमाणे दक्षिण भागातील शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी या भागात प्रशस्त हंगामी किंवा कायमस्वरूपी भाजी मार्केट उभारुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
तेंव्हा बेळगाव दक्षिणेच्या लोकप्रतिनिधींनी याप्रकरणी जाणीवपूर्वक लक्ष घालून बेळगाव दक्षिण भागात एपीएमसी होलसेल भाजी मार्केटची शाखा सुरू करावी, अशी मागणी या भागातील समस्त भाजी उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने
बेळगाव तालूका रयत संघटना -हरित सेना अध्यक्ष राजू मरवे
यांनी केली आहे.