बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोकाक आणि मुडलगी तालुक्यातील मस्टरिंग-डिमस्टरिंग केंद्राची पाहणी निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहत असलेले जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी आज (शुक्रवार, दि. २) पाहणी केली.
इलेक्ट्रॉनिक मतयंत्र ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमची सुरक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी तपासली. तसेच अरभावी मतदार संघातील मूडलगी कन्नड प्राथमिक शाळेमध्ये स्थापण्यात आलेल्या मस्टरिंग-डिमस्टरिंग केंद्राला भेट देऊन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
त्याचप्रमाणे गोकाक विधानसभा मतदारसंघाशी निरगाडीत गोकाक शहरातील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयात स्थापण्यात आलेल्या मस्टरिंग-डिमस्टरिंग केंद्राबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
तसेच अपर जिल्हाधिकारी योगेश एस., रामदुर्ग, सौंदत्ती आणि बैलहोंगल विधानसभा मतदार संघाच्या व्याप्तीत येणाऱ्या मतदार संघाचीही पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे. कोविड पार्श्वभूमीवर सरकारी मार्गसूचीनुसार सर्व खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी गोकाक आणि अरभावी मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते.