गेले चार दिवस कोरोना रुग्ण संख्येच्या बाबतीत बेळगाव तालुका सातत्याने शतक ठोकत आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांमध्ये बेळगाव तालुक्यात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून कोरूनाग्रस्तांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर गोपाळा तालुका आहे.
गेल्या चार दिवसात बेळगाव तालुक्यामध्ये सातत्याने 100 हून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. काल रविवारी तर या तालुक्यात तब्बल 157 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. सध्या जिल्ह्यात बेळगाव तालुक्याच्या खालोखाल गोकाक तालुक्याचा क्रमांक लागतो. तथापि बेळगावच्या तुलनेत कालचे 51 रुग्ण वगळता या तालुक्यामध्ये 50 पेक्षा कमीच रुग्ण आढळून आले आहेत. थोडक्यात कालच्या दिवशी गोकाकच्या तुलनेत बेळगाव तालुक्यातील रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली होती. जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये गेल्या 22 ते 25 एप्रिल या चार दिवसाच्या कालावधीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या खालीलप्रमाणे आहे.
तालुक्याचे नांव आणि त्यापुढे अनुक्रमे दि. 22, 23, 24 व 25 एप्रिल रोजीची रुग्णसंख्या : अथणी -26, 3, 21, 38. बेळगाव -118, 115, 104, 157. बैलहोंगल -9, 10, 8, 5. चिकोडी -5, 17, 9, 23. गोकाक -32, 29, 39, 51. हुक्केरी -12, 13, 10, 16. खानापूर -10, 9, 25, 15. रामदुर्ग -6, 6, 19, 2. रायबाग -1, 5, 41, 12. सौंदत्ती -12, 9, 16, 13. इतर -20, 4, 21, ,4.
दरम्यान, गेल्या 21 ते 25 एप्रिल 2021 या कालावधीमध्ये बेळगाव जिल्ह्यात एकूण 1,425 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून एकूण 480 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या पाच दिवसांपैकी सर्वाधिक 336 रुग्ण काल 25 एप्रिल रोजी आणि सर्वात कमी 220 रुग्ण 23 एप्रिल रोजी आढळून आले.
सदर पाच दिवसात दररोज आढळून आलेले रुग्ण आणि डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 21 एप्रिल : 301 रुग्ण, 45 डिस्चार्ज. 22 एप्रिल : 255 रुग्ण, 90 डिस्चार्ज. 23 एप्रिल : 220 रुग्ण, 69 डिस्चार्ज. 24 एप्रिल : 313 रुग्ण, 151 डिस्चार्ज. 25 एप्रिल : 336 रुग्ण आणि 125 डिस्चार्ज.