कार्यकर्ते हे मालक असतात, आमच्या पक्षाचा कोणीही मालक नाही. कार्यकर्ते आमच्या पक्षाचे मालक आहेत, असे विधान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी केले आहे. सोमवारी बंगळुर मध्ये आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. कर्नाटकात वंशपरंपरागत प्रशासन नाही. ते आमच्या पक्षाच्या डीएनएमध्येही नाही, असे त्याद्वारे येडियुराप्पा कुटुंबाला राजकीय वारसा मिळणार नसल्याचे त्यांनी संकेत दिले. येडियुराप्पा हे पक्षाचे नेते आहेत, मालक नाहीत, असेही सी. टी. रवी यांनी स्पष्ट केले.
आमच्या पक्षात उत्तराधिकारी जपण्याची संस्कृती नाही. काँग्रेसकडे नेहरू कुटुंबीय आहेत, द्रमुकचे करुणानिधी आहे, समाजवादी पक्षाचे मुलायमसिंग यादव यांच्याकडे कौटुंबिक मालकी आहे. पण आपल्यात ती प्रवृत्ती नाही. असे वक्तव्य करत त्यांनी इतर पक्षांना टोला लगावला. नरेंद्र मोदी, अमित शहा, येडियुराप्पा आमच्या पक्षाचे नेते; पण कार्यकर्ते हे मालक असतात. मालकी वेगळी आहे, नेत्यांची मुले राजकारणात उतरतात. दुसऱ्या पक्षाचा अंतिम निर्णय म्हणजे एखाद्या नेत्याच्या कुटुंबाचा निर्णय असतो. परंतु आमच्या पक्षात कोअर कमिटी किंवा संसदीय समिती निर्णय घेते. आमचा पक्ष प्रत्येकास गुणवत्तेवर आणि चिकाटीवर नेतृत्व गुण विकसित करण्यास अनुमती देण्यावर भर देतो, असे सी. टी. रवी म्हणाले.
आमचा कॅडर आधारित डीएनए आहे. मी पत्रकेही वितरित केली आहेत. परंतु आता माझ्या कार्यामुळे मी सरचिटणीसपदापर्यंत पोहोचलो आहे. आता मी राष्ट्रीय सरचिटणीस आहे. भाजपात कार्यकर्त्यांना संधी मिळते. कोअर कमिटी, पक्षाची समिती वगळून कोणा नेत्यांच्या कुटूंबातील सदस्यांची समिती नसते. लोकशाही हा आमच्या पक्षाचा डीएनए आहे, परंतु उत्तराधिकारी संस्कृतीत संधी नाही; यापूर्वी कधीही नव्हती, आताही नाही, असे सी. टी. रवी म्हणाले.