कोरोनाची दुसरी लाट तीव्र झाल्याने सरकार पाठोपाठ आता प्रशासनाने सुद्धा कडक नियमावली जाहीर केली आहे.
लग्न आणि तत्सम समारंभासाठी तहसीलदारांचीच परवानगी घेणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. के. हरीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे.
मार्गदर्शक सूचीचे उल्लंघन झाल्यास अथवा तहसीलदारांची अधिकृत परवानगी नसल्यास संबंधितांवर फौजदारी खटले दाखल केले जातील असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
मार्गदर्शक सूचीनुसार लग्नासाठी फक्त पन्नास जणांना सहभागी होता येईल ते सभागृहात असेल किंवा खुल्या पटांगणात असेल तरीसुद्धा 50 जणांची उपस्थिती ग्राह्य धरली जाणार आहे. समारंभाचे आयोजन जे करणार आहेत त्यांना काही अटींवरच परवानगी दिली जाणार आहे.
जर कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास आपत्ती निवारण कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास केवळ आयोजकच नव्हे तर अशा समारंभांसाठी हॉल देणारे चालक आणि व्यवस्थापक यांच्यावरही कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. के. हरीशकुमार यांनी दिला आहे