राज्यातील वाढत्या कोरोनारुग्णांच्या संख्येमुळे सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्नाटक सरकार ११ एप्रिलपासून प्रमुख सरकारी आणि खाजगी कामाच्या ठिकाणी कोविड लस देण्यास प्रारंभ करणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली. बंगळूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
११ एप्रिलपासून राज्यात कोविड लस खाजगी आणि सरकारी कामाच्या ठिकाणी वितरित केली जाऊ शकते. ज्यांचे किमान वय ४५ वर्षे आणि इच्छुक ४५ वर्षे वयाचे आहेत, त्यांना सर्वप्रथम हि लस देण्यात येणार आहे.
कामाच्या ठिकाणी लसीकरण सुरु केल्यास या मोहिमेला गती येईल, आणि लवकरात लवकर लसीकरण प्रत्येकपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास डॉ. के. सुधाकर यांनी व्यक्त केला.
अनेक मोठ्या आयटी कंपन्यांनी आणि उद्योगांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी लसीकरण करण्यास परवानगी देण्याची विनंती सरकारकडे केली होती.
१०० हुन अधिक पात्र व इच्छुक लाभार्थी असतील तर कंपन्या आता त्यांच्या कार्यालयात त्यांच्या कर्मचाऱ्यांना लस देऊन शकतात, असेही डॉ. सुधाकर यांनी स्पष्ट केले आहे.