गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोनाचा आलेख उतरत असल्याची चिन्हे दिसत असताना, पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. कर्नाटकात पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले असून रविवारी (दि. ४) बेळगाव जिल्ह्याच्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत ५२ रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे.
२०२१ मधील नोंद झालेल्या रुग्णसंख्येत आजची रुग्णसंख्या हि सर्वोच्च आहे. यासोबतच एकूण कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३०० वर जाऊन पोहोचली आहे. राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या हेल्थ बुलेटिनमध्ये हि माहिती जाहीर करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील आज नोंद झालेल्या ५२ रुग्णांमध्ये बेळगाव तालुक्यातील ३५ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये अथणी ४, चिकोडी २, गोकाक २, रायबाग ३, सौंदत्ती २, हुक्केरी, खानापूर, रामदुर्ग मधील प्रत्येकी १ आणि इतर १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
यासह एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३१० वर गेली आहे. तर संपूर्ण राज्यात एका दिवसात ४५५३ रुग्णांची नोंद झाली आहे. आज बेळगावमधील २८ रुग्ण कोरोनमुक्त झाले असून अद्याप २०९९ रुग्णांचा अहवाल येणे बाकी आहे.