बेळगाव जिल्ह्यात आज बुधवार दि 14 एप्रिल 2021 रोजी नव्याने आणखी तब्बल एकशे सात करुणा ग्रस्त रुग्ण आढळून आले असून सक्रिय रुग्णांची संख्या 661 इतकी वाढली आहे.
जिल्ह्यात नव्याने 107 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्याबरोबरच मृत्यूचा आकडा 352 झाला आहे. त्याचप्रमाणे उपचारांची बरे झालेल्या 13 जणांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्या 1 एप्रिल 2021 पासून आजतागायत आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 833 इतकी झाली आहे. दरम्यान, राज्यात आज बुधवारी नव्याने 11,265 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. बेळगाव जिल्ह्यात आज आढळलेले 107 कोरोनाग्रस्त रुग्ण हे 2021 या नव्या वर्षामध्ये एक दिवसात आढळलेले सर्वाधिक रुग्ण आहेत.