बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपाच्या उमेदवार मंगला सुरेश अंगडी १०० टक्के विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री बी.एस. येडियुराप्पा यांनी व्यक्त केला आहे. बेळगावमध्ये मंगला अंगडी यांचा प्रचार करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सदर प्रतिक्रिया दिली आहे.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत मंगला अंगडी या ३ लाख मताच्या फरकाने १०० टक्के विजयी होतील, असा विश्वास आपल्याला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. बेळगावमध्ये प्रचारादरम्यान विविध समाजप्रमुखांची भेट घेतली आहे.
सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. त्यामुळे आता मंगला अंगडी नक्कीच विजयी होतील, याची मला खात्री असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले कि, आमची विकास कामे आम्हाला विजय मिळवून देतील.
त्याचप्रमाणे, मस्की आणि बसवकल्याण पोटनिवडणूकाही आम्हीच जिंकणार असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. रात्री उशिरापर्यंत मी आमदार, पक्षाचे नेते आणि सर्व समाज नेत्यांची बैठक घेतली. आमचा उमेदवार ३ लाख मतांच्या फरकाने विजयी होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दाखवला आहे.