बुधवारी (7 एप्रिल) सायंकाळी खासबाग येथील आदर्श कन्नड मुलांची शाळा क्रमांक 3 मधील शिक्षकाला मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी तेलसंग ट्रॅव्हल्सच्या व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळा सुधारणा समितीच्या (एसडीएमसी) अध्यक्षाने सहशिक्षकाला मारहाण केल्याची नोंद शहापूर पोलिसांत झाली असून याबाबत परस्परांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. सतीश रामचंद्र ढवळे (वय 36, रा. होसूर-बसवाण गल्ली, बेळगाव) या शिक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून तेलसंगचे मालक आणि एसडीएमसी अध्यक्ष प्रदीप बसवराज तेलसंग (रा. बाजार गल्ली, खासबाग ) यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
वर्धाप्पा गल्ली, खासबाग येथील आदर्श कन्नड मुलांची शाळा क्रमांक 3 मध्ये तिसऱ्या व चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. 7 एप्रिल रोजी सकाळी ही बैठक होती. या बैठकीत ट्रान्स्फर सर्टिफिकेट देण्यावरून चर्चा झाली होती. याच कारणाने प्रदीप तेलसंग यांनी शाळेत घुसून शिक्षकाला मारहाण केल्याचे सांगण्यात आले. बैठकीत अध्यक्ष असलेल्या तेलसंग यांनी आम्हाला न सांगता विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखल कसा काय दिला याबाबत जाब विचारण्यात आला. यावर शिक्षकांनी असा कोणालाही दाखला दिला नाही, असे स्पष्टीकरण दिले. परंतु, यातूनच आपल्या जागेवरून उठत तेलसंग यांनी सतीश ढवळे यांच्यासह अन्य काही शिक्षकांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेची नोंद शहापूर पोलिसांत झाली असून, निरीक्षक राघवेंद्र हावलदार पुढील तपास करत आहेत..पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, यासंबंधी गुरुवारी रात्री प्रदीप तेलसंग यांनीही शहापूर पोलीस स्थानकात सतीश रामचंद्र ढवळे व सोमशेखर कल्लाप्पा मारिहाळ या दोन शिक्षकांनी आपल्याला मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली आहे.