कर्नाटकात बेळगाव लोकसभेसाठी 17 एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी ही निवडणूक लढवीत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार सध्याच्या निवडणुकांमध्ये जारकीहोळी हे राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याचे समोर आले आहे.
आमदार म्हणून कार्यरत असताना सतीश जारकीहोळी यांनी आपली व आपल्या कुटुंबाची मालमत्ता 148 कोटी जाहीर केली होती. म्हणजेच 2018 च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांची संपत्ती 3.5 पट वाढली आहे.
राज्यातील पोटनिवडणुकीत जारकीहोळी हे एकमेव करोडपती उमेदवार नाहीत तर तीनही जागातील सर्व प्रमुख पक्षांनी उभे केलेले उमेदवार देखील करोडपती आहेत.
या उमेदवारांपैकी सर्वात गरीब म्हणजे मस्कीचे काँग्रेसचे उमेदवार बसवानगौड आर. सूरविहाळ हे आहेत. त्यांच्याकडे 1.92 कोटीची संपत्ती आहे. त्यांच्याकडे 2018 मध्ये 2.22 कोटी मालमत्ता होती. आता त्यात कांहीशी घट झाली आहे.