बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार मंगला अंगडी यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा उद्या बुधवार दि. 14 एप्रिल पासून सलग दोन दिवस बेळगावच्या दौऱ्यावर येत आहेत.
बेंगलोर येथून हेलिकॉप्टरद्वारे उद्या बुधवारी सकाळी 11:50 वाजता मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांचे हुबळी विमानतळावर आगमन होणार आहे. तेथून ते मुडलगी येथे जाऊन तेथून ते दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत अरभावी येथे आणि त्यानंतर सायंकाळी 6 ते 7:20 वाजेपर्यंत गोकाक येथे प्रचार दौऱ्यात सहभागी होतील.
गोकाक येथून रात्री 8 वाजता मुख्यमंत्री बेळगावच्या दिशेने प्रयाण करतील. बेळगाव येथे रात्री 9 वाजता त्यांचे आगमन होईल आणि त्यानंतर ते हॉटेल यूके ट्वेंटी सेव्हन येथे वास्तव्य करतील.
दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार दि. 15 एप्रिल रोजी सकाळी 8:30 ते 10 वाजेपर्यंत मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा धार्मिक स्थळांच्या प्रमुखांच्या भेटी घेतील. त्यानंतर सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत बेळगाव दक्षिण मतदारसंघांमध्ये काढण्यात येणाऱ्या प्रचार फेरीत ते सहभागी होतील.
त्यानंतर दुपारी 12:30 ते 1:30 वाजेपर्यंत बाळेकुंद्री येथील प्रचार कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत मुख्यमंत्री पुन्हा हॉटेल युके ट्वेंटी सेव्हन येथे येऊन अल्प विश्रांती घेतील. या विश्रांतीनंतर ते हिंडलगा बेळगांव येथे सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आयोजित जाहीर सभेत सहभाग दर्शवतील.