कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून बेळगाव जिल्ह्याने २०२१ वर्षातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा नवा उच्चांक गाठला आहे. आज जिल्ह्यात ३०१ रुग्णांची नोंद झाली आहे. तर संपूर्ण राज्यात २३५५८ रुग्णांची नोंद झाली आहे.
अद्यापही १३८४ रुग्ण कोरोनावर उपचार घेत असून आज खानापूर तालुक्यात उच्चांकी रुग्णांची नोंद झाली आहे. ३०१ रुग्णांपैकी १४४ रुग्ण हे एका खानापूर तालुक्यात आढळले आहेत.
बेळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ३५५ रुग्णांचा मृत्यू झाला असून आज ४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १ एप्रिल पासून एकूण २००७ रुग्ण नव्याने आढळले असून आज नोंद झालेल्या
३०१ रुग्णांपैकी अथणीमधील २, बेळगाव मधील १०४, बैलहोंगल मधील ५, चिकोडीमधील ६, गोकाक मधील २१, हुक्केरी मधील ३, खानापूरमधील १४४, रामदुर्गमधील २, सवदत्ती मधील ७ आणि इतर ७ अशा रुग्णांचा समावेश आहे.