रात्रीच्या वेळी रस्त्याकडेला असलेल्या शेतामध्ये जाऊन दारू ढोसाणाऱ्या मद्यपींच्या जळत्या सिगारेटच्या थोटकामुळे गवत गंजीला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री शहापूर शिवारात घडली. यामुळे सुमारे दोन ट्रॅक्टर गवत भस्मसात झाले आहे.
मंगळवारी रात्रीच्या वेळी येळ्ळूर रोडवर दुचाकी थांबवून शहापूर शिवारात जाऊन वाळलेल्या पिजंराच्या गंजीच्या आडाला बसून मनसोक्त दारु ढोसत सिगारेटही ओढत बसलेल्या अज्ञातांनी जातानां दोन ट्रॅक्टर होईल येवढ्या गवताच्या गंजीला पेटवून दिले. यामुळे नारायण माळवी यांचे 10 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी रस्त्या शेजारील परक्याच्या शिवारात जाऊन पार्ट्या रंगीत पार्ट्या करण्याचे आणि जुगार खेळण्याचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे. मद्यपी मंडळी दारु, सिगारेट ओढून नशेत भांडण काढून बाटल्या फोडून जातात. त्यामूळे शेतकरी, महिलांच्या पायानां मोठ्या जखमा तर होतातच परत आता गवताच्या गंजींना आगी लावून जायचे प्रमाण भरपूर वाढल आहे.
मागच्यावेळी एकाच रात्रीत दोन भाताच्या, पाच पिंजराच्या गंजी मद्यपी आणि जुगार यांनी पेटवून दिल्या होत्या. आता पुन्हा तसे होत असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. गेल्या 31 डिसेंबर 2020 पूर्वी बेळगाव शहर आणि तालूका रयत संघटनेने बेळगाव ग्रामीण पोलिस ठाणे व पोलिस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांना निवेदन दिले होते.
त्यानंतर अल्पकाळासाठी या गैरप्रकारांना आळा बसला होता. मात्र आता परत शिवारात पार्ट्या, जूगार, दारु, सिगारेट ओढणाऱ्यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. तेंव्हा पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शहरानजीकच्या शिवार परिसरात रात्रीच्या वेळी गस्त वाढवून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे. त्यांच्यातील भीतीचे वातावरण दूर करावे, अशी मागणी बेळगाव शहर व तालका रयत संघटनेतर्फे तसेच समस्त शेतकरी बांधवांकडून केली जात आहे.